Advertisement

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये १२-१३ नोव्हेंबरला पाणीकपात

मुंबईतील काही भागांमध्ये पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये १२-१३ नोव्हेंबरला पाणीकपात
SHARES

मुंबईतील काही भागांमध्ये पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. पवई इथं वैतरणा (२४०० मिली मीटर) आणि उर्ध्व वैतरणा (२७५० मिली मीटर) यामधील ९०० मिली मीटर व्यासाच्या छेद जलजोडणीवर गळती उद्भवली आहे.

महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे गळती दुरुस्तीचे काम तातडीनं हाती घेण्यात आलेलं आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे मलबार हिल, वरळी आणि पाली इथल्या जलाशयाद्वारे आणि माहिम इथून होणाऱ्या थेट पाणीपुरवठ्यावर १२ नोव्हेंबर २०२१ ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ या दरम्यान परिणाम होणार आहे.

  • जी दक्षिण विभाग

वरळी कोळीवाडा, पोचखानवाला मार्ग, वरळी बीडीडी चाळ, प्रभादेवी, डिलाईल मार्ग, आदर्श नगर, जनता कॉलनी, वरळी हिल मार्ग

  • जी उत्तर विभाग

माहिम (पश्चिम), दादर (पश्चिम), प्रभादेवी

  • डी विभाग

लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपिअन्सी रोड), भुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, रीज मार्ग, महालक्ष्मी मंदीर विभाग, एल. डी. रुपारेल मार्ग

  • ए विभाग

कुलाबा, न्यू फोर्ट, बॅक बे, मिलेट्री ऍन्ड नेव्ही विभाग, साबू सिद्दीकी


गळती दुरुस्तीच्या कामामुळे या परिसरांमध्ये दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजीसुद्धा कमी दाबानं आणि अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.हेही वाचा

डासांमुळे वाढतोय आजारांचा प्रादुर्भाव

शिवाजी पार्क जिमखान्याची निवडणूक १३-१४ नोव्हेंबरला होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा