Advertisement

शिवाजी पार्क जिमखान्याची निवडणूक १३-१४ नोव्हेंबरला होणार

दादर इथल्या शिवाजी पार्क जिमखान्याला ११० वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत.

शिवाजी पार्क जिमखान्याची निवडणूक १३-१४ नोव्हेंबरला होणार
SHARES

दादर इथल्या शिवाजी पार्क जिमखान्याला ११० वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. सदस्यांच्या निस्वार्थ परिश्रमामुळे जिमखाना नेहमीच चर्चेत राहिला आहे.

शिवाजी पार्क जिमखान्याचा जन्म "न्यू महाराष्ट्र क्रिकेट क्लब" म्हणून झाला. १९०९ मध्ये पी. जी. मराठे आणि त्यांच्या दोन भावांसह एस. पी. आठल्ये, एल. एम. वैशंपायन, एन. टी. काणे आणि इतरांनी त्याची स्थापना केली.

प्रसिद्ध शिवाजी पार्क जिमखाना, ज्यानं भारतीय क्रिकेट संघाला अनेक कसोटी खेळाडू दिले आहेत. अशा या जिमखान्याची २०२१ ची निवडणूक १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांची जिमखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. गेली नऊ वर्षे त्यांनी जिमखान्याचे अध्यक्षपद भूषवले आहे.

मात्र, प्रवीण अमरे-अनिरुद्ध जोशी पॅनलनं विश्वस्त आणि कार्यकारिणी पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अमरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी पार्क जिमखान्या तर्फे कोरोना व्हायरस प्रतिबंधक अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. यासाठी त्यांचं जेवढं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

शिवाजी पार्क जिमखाना निवडणूक २०२१ साठी अमरे-जोशी पॅनलकडून अनिरुद्ध जोशी सरचिटणीसपदासाठी निवडणूक लढवणार आहेत.

अमरे-जोशी पॅनेलच्या जाहीरनाम्यात सर्वसमावेशकता, लोकशाही आणि उत्पादकता यांना चालना देण्यासाठी शिवाजी पार्क जिमखाना घटनेत सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेसह मुलांसाठी उपक्रम, खेळ आणि खेळांच्या जाहिरातीसह स्वच्छ आणि पारदर्शक कारभार सुकर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हे पॅनेल भारतभरातील भागीदार क्लबशी संलग्नता मिळवण्याची खात्री देते.

नामांकित रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांशी भागीदारी करून सदस्यांसाठी आरोग्य तपासणीचे आयोजन करू. तसंच रक्तदान मोहीम देखील राबवू. जिमखाना एन्ट्री पॉईंटवर आधुनिक स्वयंचलित प्रवेश प्रणाली सादर करू, असंही त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

याशिवाय खानोलकर-मुरकर हे यंदाच्या निवडणुकीत विरोधात असलेले दुसरे पॅनल आहे. खानोलकर-मुरकर पॅनलकडून सरचिटणीसपदासाठी संजीव खानोलकर रिंगणात आहेत. तर अध्यक्षपदासाठी दीपक मुरकर रिंगणात आहेत.

आगामी टर्मसाठी खानोलकर-मुरकर पॅनेलच्या प्रस्तावित अजेंड्यात - मुंबई आणि महाराष्ट्रात अधिक संलग्नता असणे, लॉबीला अधिक प्रेझेंटेबल आणि सुखदायक एन्ट्री करणे, १२, १४ आणि १६ वर्षाखालील मुलींना पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देणे यांचा समावेश आहे.

जाहीरनामा देखील याची खात्री देतो. इनडोअर स्पोर्ट्ससाठी नवीन अकादमी सुरू करणे आणि जिमखान्यामध्ये नवीन कल्पना आणण्यासाठी सर्व क्षेत्रातील नवीन सदस्य जोडण्याबरोबरच क्लबच्या क्रियाकलापांचा विस्तार करणे, असंही जाहीरनाम्यात म्हटलं आहे.



हेही वाचा

औषधांच्या किंमती ४० टक्क्यांनी महागल्या

ओशिवरा पुल पुन्हा वाहतुकिसाठी खुला

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा