Advertisement

शुक्रवारी आणि शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद

24 आणि 25 मार्च रोजी अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही.

शुक्रवारी आणि शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद
SHARES

पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवार आणि शनिवार २४ आणि २५ मार्च रोजी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. 24 आणि 25 मार्च रोजी ठाण्यातील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे विभागातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा योजनेंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या बारवी ग्रॅव्हिटी वाहिन्या तातडीने सुरू करण्याचे काम सुरू असल्याने शुक्रवार आणि शनिवार 24 आणि 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्या अंतर्गत दिवा आणि कळवा प्रभाग समिती अंतर्गत सर्व परिसर, मुंब्रा प्रभाग समितीमधील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन दलाचा परिसर आणि वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, मानपाडा समिती अंतर्गत 2, नेहरूनगर तसेच कोलशेत खालचा गाव 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने राहणार आहे.हेही वाचा

24 आणि 25 मार्च रोजी मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा