मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क परिसरात गोड्या पाण्याच्या विहिरी सापडल्या आहेत. शिवाजी पार्क मैदानाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प लवकरच सुरु होणार आहे. त्याआधी इथे ३५ विहिरी खोदण्यात आल्या. त्यात पाच विहिरींमध्ये गोडे पाणी लागले आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प राबण्याचे मुख्य कारण म्हणजे गेले अनेक वर्ष शिवाजी पार्क परिसरात राहणारे रहिवाशी हे धुळ-मातीचा सामाना करत आहेत. ज्यामुळं त्यांना अनेक आजारांचा तोंड द्यावं लागत आहे.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात अनेक खेळ खेळले जातात. विशेषता क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. या मैदानातून भारतीय क्रिकेट संघात अनेक खेळाडूंची वर्णी लागली आहे. परंतू, आता याच मैदानामुळं अनेक स्थानिक नागरिकांना आजारांच्या त्रास सहन करावा लागतो आहे. हे आजार या मैदानातून येणाऱ्या धूळ व मातीमुळं होत आहेत.
'क्रिकेटसह या मैदानात वर्षातून २ परेड होतात. या परेडसाठी पक्का रस्ता तयार करावा लागतो. त्यामुळं या रस्तासाठी मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्क मैदानात माती आणली जाते व ती टाकून त्यापासून एक चांगला रस्ता तयार केला जातो. जेणेकरून परेड करत असताना कोणतेही अडथळे निर्माण व्हायला नको. मात्र परेड झाल्यानंतर काही दिवसांनी पक्का रस्त्यासाठी टाकण्यात आलेली माती ही हवेद्वारे शिवाजी पार्क परिसराच्या चहूबाजूला पसरते. त्यामुळं अनेक इमारतींवर धळ व मातीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. एवढंच नव्हे तर या मातीमुळं अनेक ज्येष्ठ नागरिकांना अस्तमा, खोकला, सर्दी यांसारखे आजार होत आहेत. शिवाय, लहान मुलांनाही याचा धोका आहे', अशी माहिती शिवाजी पार्क परिसरात राहणारे रहिवाशी डॉ. सुहास पटवर्धन यांनी दिली.
त्यामुळं या धुळ-माती व त्यापासून होणारे आजार नष्ट करण्यासाठी येथील रहिवाशांनी एकत्रित येऊन महापालिकेला गाऱ्हाणं घातलं. या नागरिकांनी गेल्या ५ वर्षांपूर्वी हे गाऱ्हाणं घातलं होतं. परंतू, सकारात्म उत्तर यांना मिळत नव्हतं. मात्र, अखेर ५ वर्षांनंतर महापालिकेनं या नागरिकांना सकारात्मक उत्तर दिलं आहे. त्यानुसार, शिवाजी पार्क मैदानात कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे.
यासाठी भूगर्भशास्त्रज्ञ नंदन मुणगेकर यांच्या अभ्यासाची मदत घेण्यात आली आहे. नंदन मुणगेकर यांनी मुंबईच्या अनेक भागात अशा पाण्याच्या टाक्या तयार केल्या आहेत. ज्या पाण्याचा वापर सर्व कामासाठी केला जाऊ शकतो. भूगर्भशास्त्रज्ञ नंदन मुणगेकर व दिलीप विगने यांनी प्लॅटिनम रॉडच्या सहाय्यानं या गोड्या पाण्याच्या विहिरी शोधून काढल्या. हे प्लॅटिनम रॉड समान अंतरावर पकडल्यानंतर जिथे पाणी नाहीय, त्या ठिकाणी हे रॉड परस्परांपासून लांब जातात आणि जिथे भूगर्भात पाणी आहे, तिथे हे रॉड जवळ येतात, अशा पद्धतीने शिवाजी पार्कमध्ये या गोड्या पाण्याच्या विहिरी शोधण्यात आल्या.
दरम्यान शिवाजी पार्क मैदान हे समुद्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळं इथ गोडं पाणी लागल्यानं आनंद व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा -
शुभवार्ता! केरळमध्ये दाखल होतोय मान्सून
देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक