Advertisement

गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवास तासाभरात, तिकिट, पाससाठी 'इतके' आकारणार

येत्या आठवड्यापासून वॉटर टॅक्सी सेवा सुरू होईल, असे सिन्हा यांनी सांगितले.

गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवास तासाभरात, तिकिट, पाससाठी 'इतके' आकारणार
SHARES

नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि ‘नयन इलेव्हन’ वॉटर टॅक्सीचे मालक कॅप्टन रोहित सिन्हा यांनी नवी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूरपर्यंत वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. येत्या आठवड्यापासून टॅक्सी सेवा सुरू होईल, असे सिन्हा यांनी सांगितले.

इंडियन एक्स्प्रेसमधील एका वृत्तानुसार, सिन्हा यांनी सांगितले की, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये नवीन नियोजित वॉटर टॅक्सी मार्ग वातानुकूलित केबिनसह लक्झरी प्रदान करून प्रवासाचा अनुभव सुलभ करेल आणि परवडणाऱ्या भाड्यांसह प्रवासाचा वेळ देखील वाचवेल.

वॉटर टॅक्सी 20-25 किमी प्रतितास वेगाने प्रवास करेल आणि 200 प्रवासी बसण्याची प्रचंड क्षमता असेल.

कमी भाडे, कमी प्रवास वेळ, अधिक आराम

वॉटर टॅक्सी प्रवाशांना एसी केबिनचा अनुभव देईल आणि प्रवासाचा वेळ कमी करेल. पोहोचण्यासाठी फक्त एक तासापेक्षा कमी वेळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परवडणाऱ्या किमतीत प्रवास होईल. 

विशेष सवलत

या नव्याने दाखल झालेल्या वॉटर टॅक्सीचा उद्देश मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा प्रवास सुलभ आणि जलद करणे हा आहे. या शहरांमध्ये दररोज ऑफिसला जाणाऱ्यांची मोठी लोकसंख्या आहे. म्हणून, सिन्हा यांनी जाहीर केले की ते सेवेसाठी मासिक पास घेणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष 20 टक्के सवलत असेल.

तथापि, हा पास फक्त आठवड्याच्या ६ दिवस वैध असेल कारण आठवड्याच्या शेवटी सेवा बंद असेल.

भाऊ चा धक्का डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (DCT) ते मांडवा या दरम्यानची वॉटर टॅक्सी सेवा मुंबई आणि अलिबागमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी वीकेंडला चालेल.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा