गोवंडीतल्या रस्त्यावर वाहतंय पाणी

 Govandi
गोवंडीतल्या रस्त्यावर वाहतंय पाणी

गोवंडी - शिवाजीनगर मधील बाजीप्रभु देशपांडे मार्गावर पाऊस नसला तरी पाणी भरल्याचं पाहायला मिळतं. शिवाजीनगरचा हा मुख्य रस्ता असताना स्थानिकांना याच मार्गावरुन जावं लागतं. शालेय विद्यार्थी, वृद्ध, सर्वच या रस्त्यावरुन ये-जा करतात. वारंवार तक्रार करुनही पालिका लक्ष देत नसल्याचं कळतंय. तर याविषयी एम पूर्व वॉर्डच्या अधिकाऱ्यांशी बोललं असता पाइपलाइन फुटली असल्यामुळे हे पाणी या भागात साचून राहतं आणि त्यामुळे शेकडो लीटर पाणी वाया जातं. तर रस्ता चांगला नसल्यानं पाणी जमा होत असल्याचं नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांनी सांगितलं. लवकरात लवकर यावर तोडगा काढणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं.

Loading Comments