क्रॉफर्ड मार्केट भागात जादा कचऱ्याच्या डब्यांची मागणी


SHARE

मस्जिद - दुर्गंधीला कंटाळून क्रॉफर्ड मार्केट भागात राहणाऱ्या रहिवाशांनी जादा कचऱ्याच्या डब्यांची मागणी पालिकेकडे केली होती. मात्र तरीही अद्याप या भागात कचऱ्याचे डबे पुरवण्यात आले नाहीत. सध्या या परिसरात चार कचऱ्याचे डबे असून दुपारी बाराच्या सुमारास ते डबे कचऱ्याच्या ढीगात हरवून जातात. त्यामुळे येथे कचऱ्याचे डबे वाढवावे अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे. ये-जा करणाऱ्या नागरिकांना देखील या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. इथले रहिवासी विश्वास खरे यांनी सांगितलं की, या भागामध्ये फळ मार्केट असल्याने ये-जा करणारे नागरिक येथे नेहमी कचरा टाकतात, त्यामुळे डासांची पैदाससुद्धा होते, म्हणून या भागात जादा कचऱ्याचे डबे दिल्यास कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरित्या होईल.’

संबंधित विषय
ताज्या बातम्या