Advertisement

गोरेगांव स्थानकावरील पुलावर नाही छप्पर


 गोरेगांव स्थानकावरील पुलावर नाही छप्पर
SHARES

गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाची दुरुस्ती करून, तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र चर्चगेटच्या दिशेने असलेला हा पादचारी पूल छपराविना आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना रखरखत्या उन्हातून प्रवास करावा लागत आहे. या पादचारी पुलावर छप्पर लावण्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा केल्यानंतरही रेल्वे प्रशासन याकडे सतत कानाडोळा करत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

या प्रकरणी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखील संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत, पादचारी पुलावर छप्पर बसवण्यात यावे, अशी मागणी केली होती. तरी देखील अद्याप छप्पर बसवण्यात आलेले नाही.

पादचारी पुलावर छप्पर नसल्याने प्रवाशांना रखरखत्या उन्हात त्रास सहन करावा लागत असल्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. या पादचारी पुलावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतानाही रेल्वे प्रशासन पुलावर छप्पर का बसवत नाही? रेल्वे प्रशासन काय झोपा काढत आहे का? 

नयना भोईर - प्रवासी 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा