Advertisement

प्रभादेवी स्थानकात उभारणार ६ मीटर रुंदीचा नवा पूल

प्रभादेवी (एल्फिन्स्टन) चेंगराचेंगरी दुर्घटनेत २३ प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला रेल्वे पादचारी पूल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

प्रभादेवी स्थानकात उभारणार ६ मीटर रुंदीचा नवा पूल
SHARES

पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड) स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २३ निष्पाप जिवांचा बळी गेला होता. तसंच, अनेक जण जखमी झाले होते. आजही या दुर्देवी घटनेची आठवण येताच अंगावर शहारे येतात. परंतु आता, हा पादचारी पूल बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. या ठिकाणी ६ महिन्यांत ६ मीटर रुंदीचा नवा पूल उभारण्यात येणार आहे.

४७ वर्षे जुना पूल

प्रभादेवी स्थानकातील हा पूल ४७ वर्षे जुना असून, तो सन १९७२मध्ये उभारण्यात आला होता. या पुलाचा दादर दिशेकडील भाग तोडण्यात येणार आहे. या नवीन पुलाला सरकते जिने देखील जोडण्यात येणार आहेत. या कामासाठी अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.

६ मीटर रुंद

प्रभादेवी स्थानकातील नवा पूल मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडण्यात येणार असून, तो ६ मीटर रुंदीचा असणार आहे. लष्करी पुलासह पूर्व-पश्चिम जोडणारा आणि होम फ्लॅटफॉर्म ते अप फ्लॅटफॉर्म जोडणारा पूल सध्या स्थानकात सुरू असल्यानं प्रवाशांची गैरसोय होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.हेही वाचा -

मुंबईसह उपनगरात सोमवारी मुसळधार पावसाची शक्यतासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा