Advertisement

अशा नालेसफाईचा फायदा काय?


अशा नालेसफाईचा फायदा काय?
SHARES

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे धारावी एम. जी. रोड विभागात पालिकेच्या वतीने नालेसफाईला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र नालेसफाईला 8 दिवस होऊन गेले असले तरी नाल्यातून काढलेला कचरा नाल्याच्या कडेलाच ठेवलेला आहे. काढलेला कचरा उचलला नसल्यामुळे तो पुन्हा त्या नाल्यात पडत आहे. त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी नालेसफाईचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित केला आहे.

एम. जी. रोडवर सर्वत्र नाल्यातून काढलेल्या कचऱ्याचा खच पडला असून, काढलेला कचरा नाल्याच्याच शेजारी टाकल्याने तो पुन्हा नाल्यातच पडत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे पालिका फक्त दाखवण्यापुरतं काम करत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. फक्त फंड पास करायचा, कंत्राटदाराला काम द्यायचं, म्हणजे पालिकेचे काम संपलं, अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे.

अधीच घाणीमुळे त्रस्त असलेल्या जनतेला आता या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नालेसफाईचे काम चालू आहे त्याबद्दल आम्ही पालिकेचे आभारी आहोत. पण ते आम्हा जनतेच्या सोयीचं केल्यास आणखी उत्तम होईल. कारण नाल्यातील कचरा काढल्यानंतर जर तो भरून नेला नाही आणि तिथेच पडून राहिल्यास पुन्हा नाल्यात पडणार आणि पावसाळ्यात पुन्हा धारावीचा एमजी रोड नेहमीप्रमाणे जलमय होणार. हे टाळायच असेल तर कृपया कचरा उचलण्यात यावा, जेणेकरून नालेसफाईचे हाती घेतलेले काम पूर्ण होईल आणि धारावीची जनता या पावसाळ्यात तरी नाले तुंबण्याच्या त्रासापासून वाचेल.
राजू शेख, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा