Advertisement

मुंबईची लेव्हल एक कधी होणार? मुंबईचे डबेवाले प्रतिक्षेत

मुंबई लेव्हल एक मध्ये येत नाही तो पर्यंत सर्व सामान्यांना लोकलनं प्रवास करण्याची अनुमती मिळणार नाही असे सरकार कडून जाहीर केले आहे.

मुंबईची लेव्हल एक कधी होणार? मुंबईचे डबेवाले प्रतिक्षेत
SHARES

मुंबई लेव्हल ३ मध्ये आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी होत असला तरी तो धोका संपलेला नाही. लोकल प्रवास तातडीनं सर्वसामान्यांसाठी सुरू करणं शक्य नाही. कोरोना पॅाझिटिव्हिटी दराबाबत मुंबई लेव्हल १ मध्ये येत नाही तो पर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार केला जाणार नाही असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेड्डीवार यांनी जाहीर केलं.

मुंबईत जेवणाचे डबे कार्यालयात वेळेवर पोहचवता यावेत म्हणुन मुंबईच्या डबेवाल्यांना ही लोकलने प्रवास करू देण्याची मागणी मुंबई डबेवाला असोशिएशननं सरकार कडे केली होती परंतु अद्याप पर्यंत सरकारने ही मागणी मान्य केली नाही. शिवाय, आता तर मुंबई लेव्हल एक मध्ये येत नाही तो पर्यंत सर्व सामान्यांना लोकलनं प्रवास करण्याची अनुमती मिळणार नाही असे सरकार कडून जाहीर केले आहे.

पहिल्या लॅाकडाऊनमध्ये सरकारनं डबेवाल्यांचा विचार केला होता व एक जी. आर. काढून डबेवील्यांना लोकलनं प्रवास करून आपली सेवा देण्यास अनुमती दिली होती तशीच अनुमती दुसऱ्या लॅाकडाऊनमध्ये मिळावी ही मुंबई डबेवाला असोशिएशननं सरकारकडं मागणी केली होती.

कांदिवली, बोरीवली येथून जर मंत्रालयात जेवणाचा डबा पोहचवायचा असेल तर 'बेस्ट'च्या बसनं तो डबा वेळेवर आम्ही पोहचवू शकत नाही आणि सायकलनं तर डबा पोहचवणं शक्यच नाही. लोकलनं प्रवास करूनच डबा मंत्रालयात वेळेवर पोहचवू शकतो. लोकलनं प्रवास करण्याची अनुमती सरकारनं डबेवाल्यांना दिली तरच डबेवाला आपली सेवा वेळेवर मुंबईत देऊ शकतो.

डबेवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे त्यांचा रोजगार ही जवळ जवळ बंदच आहे, त्यांना उपजिविकेचे दुसरे साधन नाही तेव्हा सरकारनं या बाबत विचार करून डबेवाल्यांना लोकलनं प्रवास करू देण्याची अनुमती द्यावी. दक्षिण मुंबईतील अनेक रुग्णालयातील डॅाक्टरांचे जेवणाचे डबे डबेवाला सायकलच्या  सह्हायाने सध्या पोहचवत आहे. सरकारनं डबे पोहचवणं ही सेवा अत्यावश्यक सेवा जाहीर करावी मग या अशा समस्या कायमच्या दुर होतील.



हेही वाचा -

घरोघरी जावून कोरोना लस देण्यासाठी केंद्र सरकारचा नकार

राजकीय जाहिरातींना लसीकरण केंद्रांवर मनाई


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा