Advertisement

टोपल्यांनी अडवला रस्ता !


टोपल्यांनी अडवला रस्ता !
SHARES

माहीम - माहीम स्थानकासमोरील फुटपाथवर झोपड्यांचे अतिक्रमण झालेले दिसून येत आहे. या झोपड्या माहिममधून धारावीला जाणा-या रोडच्या बाजूला आहेत. या झोपड्यांमधील सांडपाणी थेट रस्त्यावर येते. तसेच या झोपड्यांमधील मुले रस्त्यावर खेळण्यासाठी येत असल्याने वाहतुकीलाही वेळोवेळी व्यत्यय निर्माण होतो. या संपूर्ण मार्गावरील फुटपाथही चालण्यायोग्य राहिलेले नसल्याने वर्दळीच्या या मार्गावर पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. या फुटपाथवर रहणा-या लोकांचा बांबूच्या टोपल्या बनवण्याचा व्यवसाय असल्यामुळे त्यासाठी लागणारे बांबू हे अनेकदा रस्त्यावर ठेवले जातात. नवरात्रोत्सवात घटस्थापनेसाठी लागणा-या टोपल्या बनवण्याचे सध्या काम सुरु असल्यामुळे या टोपल्या जवळपास थेट रस्त्यावरच बनवल्या जातात असं म्हटल तरी वाावगं ठरणार नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा