Advertisement

फुटपाथ की हस्तोद्योग केंद्र


फुटपाथ की हस्तोद्योग केंद्र
SHARES

माहीम - फुटपाथवर होणारे अतिक्रमण ही मुंबईतील सार्वत्रिक समस्या. अतिक्रमण नाही असे फुटपाथ सापडणे कठीण. माहीम स्थानाकासमोरील फुटपाथवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. येथे राहणाऱ्यांनी थेट फुटपाथवरच टोपल्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. नवरात्रोत्सवात घटस्थापनेसाठी लागणा-या टोपल्या बनवण्याचे सध्या काम सुरू आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. फुटपाथ, रस्ते, बसस्टॉप सगळीकडेच टोपल्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहने आणि शाळेत जाणाऱ्या मुलांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा