खराब रस्त्याला जबाबदार कोण?

 Chembur
खराब रस्त्याला जबाबदार कोण?
खराब रस्त्याला जबाबदार कोण?
See all

चेंबूर - सेल कॉलनी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून खासगी विकासकांमार्फत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात ट्रक आणि सिेमेंट मिक्सरच्या गाड्या येत असतात. मात्र या सगळ्यामुळे परिसरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, गटारे देखील तुटली आहेत. या सगळ्याचा त्रास इथल्या नागरिकांना होत आहे. विशेष म्हणजे यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्यही मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. या विकासकाकडून योग्य खबरदारी न घेतल्यानेच या त्रासाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी नितीन नांदगावकर यांनी केला. याबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करून कारवाईची मागणीही केली आहे.

Loading Comments