पालिका विभागात अस्वच्छता


  • पालिका विभागात अस्वच्छता
SHARE

मालाड - महापालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यलयाच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. कार्यालय आवारात मालाडमधील कारवाई केलेल्या बॅनरचा खच पडलाय. तसंच अनेक अडगळीच्या वस्तूही पडून आहेत. बॅनरचा खच पडलेल्या जागेच्या बाजूलाच पालिकेच्या विदयुत विभागाचं कार्यालय आहे. त्यामुळे या सर्व अडगळीचा सामना विदयुत विभागात काम करणाऱ्या अभियंत्यासह कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागतो आहे. मात्र तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल या कर्मचाऱ्यांना पडला आहे. याबाबत पी उत्तर पालिका विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या