Advertisement

मुंबईकरांनी हिवाळ्यात पावसाळा अनुभवला


मुंबईकरांनी हिवाळ्यात पावसाळा अनुभवला
SHARES

दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसाळा चांगलाच लांबला. नवरात्रोत्सव, दिवाळी या सणाच्या दिवसातही पावसाने मुंबईत हजेरी लावली. सध्या हिवाळा सुरू असून थंडीचा कडाका वाढू लागलेला असतानाच सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते.


या ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या

नोव्हेंबरमध्ये हवेतील गारवा वाढलेला असताना सोमवारी दादर, कामोठे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणी ढगाळ वातारणासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.


चाकरमान्यांची तारांबळ उडाली

हिवाळ्यात सकाळी सकाळीच अशाप्रकारे अचानक पावसाला सुरुवात झाल्यानंतर चाकरमानी आणि शाळेत जाणाऱ्या विद्यांर्थ्यांचा गोंधळ उडाला.  गेले काही दिवस राज्यभरात थंडीचा पारा चढत असताना अचानक झालेल्या पावसामुळे वातावरण बदलून गेले. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा