मांजरी पाळल्या म्हणून 'त्यांना' घर नाकारलं!

Versova
मांजरी पाळल्या म्हणून 'त्यांना' घर नाकारलं!
मांजरी पाळल्या म्हणून 'त्यांना' घर नाकारलं!
मांजरी पाळल्या म्हणून 'त्यांना' घर नाकारलं!
See all
मुंबई  -  

मुंबईच्या वर्सोव्यात राहणाऱ्या आरती यांना प्राणीप्रेम चांगलंच महागात पडलं आहे. कारण त्या रहात असलेल्या सोसायटीच्या सदस्यांनी त्यांच्या प्राणीप्रेमावर आक्षेप घेतला आहे. 'पीपल फॉर अॅनिमल' संस्थेशी जोडलेल्या प्राणी मित्र आरती यांना मांजर पाळण्याची आवड आहे. त्यांच्या घरात एकूण 12 मांजरी आहेत. त्यामुळे सोसायटीतल्या रहिवाशांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरती मुंबईतल्या वर्सोवामधील गीतांजली सोसायटीत राहतात. आरती प्राणी मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या घरात 12 मांजरी देखील पाळल्या आहेत. त्या मांजरींची संख्या आणखी वाढू नये यासाठी त्यांनी त्यांचे निर्बिजीकरणही करून घेतले आहे.

याचमुळे आरती यांना रहात असलेला फ्लॅट आपल्या नावे करून घेताना मोठी अडचण येत आहे. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्या पती आणि आईसोबत राहतात. त्यांच्या भावांनीदेखील तो फ्लॅट आरती यांच्या नावे व्हावा यासाठी सोसायटीला एनओसी पत्र दिले आहे. मात्र, गीतांजली या सोसायटीचे अध्यक्ष त्यांच्या नावे फ्लॅट करुन देण्यास नकार देत आहेत.

सेक्रेटरी आणि अध्यक्ष यांच्या हातमिळवणीमुळे आपल्याला घर नाकारले जात असल्याचे आरती गुप्ता यांचे म्हणणे आहे. आपलेच घर आपल्याला हस्तांतरीत करण्यास का टाळाटाळ केली जात आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबात सोसायटीच्या अध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे, आरती आणि त्यांचे पती चांगले नाहीत, ते मांजरी पाळतात ज्याला सोसायटीतील रहिवाशांचा विरोध आहे.

2011 मध्ये सोसायटीतल्या रहिवाशांनी मांजरींना विजेच्या मीटरबॉक्समध्ये कोंबून त्यांची हत्या केल्याची तक्रार आरती यांनी केली. तसेच यासंदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सोसायटीतील सदस्य त्याचाच बदला घेत आहेत, असा दावाही आरती यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी सोसायटीतल्या रहिवाशांनी एका मांजरीला मारहाण केल्याने ती जखमी झाली होती. त्या मांजरीवर उपचारही केल्याचे आरती यांनी सांगितले. या प्रकरणी आरती यांनी आता प्रशासनाकडे न्याय मागितला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.