Advertisement

Worli BDD chawal blast : ४ वर्षांच्या मुलानंतर आईचाही मृत्यू

वरळीतील बीडीडी चाळीमध्ये ३० नोव्हेंबर रोजी सिलिंडर स्फोट झाला होता. यामध्ये आतापर्यंत एकाच तुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर...

Worli BDD chawal blast : ४ वर्षांच्या मुलानंतर आईचाही मृत्यू
SHARES

वरळी बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडरमध्ये भाजलेल्या पुरी कुटुंबातील चार महिन्यांच्या बाळानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. परंतु आता त्यापाठोपाठ त्या बाळाच्या आईनेही सोमवारी शेवटचा श्वास घेतला. या घटनेतील त्यांच्या ५ वर्षांच्या बाळावर सध्या उपचार सुरू आहेत.

वरळीतील बीडीडी चाळीमध्ये ३० नोव्हेंबर रोजी सिलिंडर स्फोट झाला होता. त्यानंतर नायर रुग्णालयामध्ये भाजलेल्या दोन बाळांसह त्यांच्या आई-वडिलांना दाखल करण्यात आले होते. पण नायर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि दुर्लक्षामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

या घटनेनंतर एक डिसेंबर रोजी दाखल झालेल्या चार महिन्यांच्या मंगेश पुरी याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गंभीररित्या भाजलेल्या २७ वर्षीय त्याचे वडील आनंद पुरी यांचा मृत्यू चार डिसेंबर रोजी झाला होता. त्यानंतर सोमवारी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २५ वर्षीय बाळाची आई विद्या पुरी यांचा मृत्यू झाला.

तर पाच वर्षीय विष्णू पुरी यांची प्रकृती स्थिर असल्याचं कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केलं. विष्णू पुरी हा १५ ते २० टक्के भाजला होता. त्यामुळे या घटनेतील ५ वर्षीय विष्णू पुरी हा मुलगा वाचला होता. पण आई-वडिल आणि भाऊ गेल्यानं विष्णू अनाथ झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल येत्या मंगळवार-बुधवारी प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून पुढील कारवाई डॉक्टर तसंच संबंधित कर्मचाऱ्यांवर केली जाणार आहे.हेही वाचा

परमबीर सिंह यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयानं दिले महत्त्वपूर्ण आदेश

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा