Advertisement

तब्ब्ल ८ महिने 'ती' राहिली आईच्या मृतदेहासोबत; वांद्र्यातील धक्कादायक घटना

महिलेच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

तब्ब्ल ८ महिने 'ती' राहिली आईच्या मृतदेहासोबत; वांद्र्यातील धक्कादायक घटना
SHARES

मुंबईतील वांद्रे (bandra) परिसरात एक मुलगी मागील ८ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत (deadbody) राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मुलीचं वय ५६ असून, ती मृत आईसोबत राहत होती. याबाबत महिलेच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना वांद्रे येथील घरात ८३ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे.

महिलेची मुलगी घराच्या खिडकीतून कचरा फेकत असल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीस मुलीच्या घरी  पोहोचले असता मुलगी संपूर्ण लॉकडाउनदरम्यान आपल्या आईच्या मृतदेहासोबत घरात राहत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना समजली. यानंतर पोलिसांनी (mumbai police) शेजाऱ्यांकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी महिलेच्या मुलीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळेच मुलीनं आईच्या मृतदेहासोबत कोणाला माहिती दिली नसावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मुलीनं काही वर्षांपूर्वी तिच्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतरही अशाच पद्धतीनं कोणाला न कळवता घरात मृतदेह ठेवला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला असून, आईच्या मृत्यूसंबंधी विचारण्यात आलेले प्रश्न, मृत्यूचं कारण यासंबंधी काहीही उत्तर देऊ न शकल्यानं मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा