मुंबई उपनगरात आता महिलाही रिक्षा चालवणार

Mumbai  -  

मुंबई - सध्या महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. मग ते क्षेत्र कोणतंही असो. मुंबई उपनगरात येत्या काळात महिलाही रिक्षा चालक असणार आहेत. महिलांनी नव्याने टाकलेल्या या धाडसी पावलाबाबत मुंबईकरांना नक्की काय वाटतं हे आज आम्ही मुंबईकरांकडून जाणून घेतलय.

महिला या क्षेत्रात आल्यामुळे रिक्षा चालक पुरुषांच्या धंद्यावर याचा परिणाम होईल. तर महिला रिक्षा चालक असल्यामुळे मुलींना सुरक्षितता वाटेल आणि त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी असणार आहे अशी प्रतिक्रिया या वेळी काही मुंबईकरांनी दिली.

Loading Comments