Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन

महिलांच्या तक्रारी व समस्या शासकीय यंत्रणेमार्फत सोडविण्याचा अनोखा उपक्रम

जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
SHARES

महिला लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हास्तरावर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत हा आदेश देण्यात आला आहे. मुंबई शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे करण्यात येणार आहे.

महिला लोकशाही दिनानिमित्त तक्रार दाखल करण्यासाठी नमुना तक्रार अर्ज, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 117 B.D.D. चाळ, पहिला मजला, वरळी मुंबई 400018 येथे उपलब्ध आहे. अर्ज विहित नमुन्यात असावा, तक्रार/विधान वैयक्तिक असावे.

न्यायिक बाबी, विहित नमुन्यात नसलेले अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांच्या जोडलेल्या प्रती, तक्रार/अहवाल वैयक्तिक नसल्यास, असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती मुंबई शहर महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी दिली आहे.हेही वाचा

हँगिंग गार्डनमधल्या जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी समितीची स्थापना

तणावग्रस्त डॉक्टरांच्या मदतीसाठी नायर हॉस्पिटलचा 'श्रुती' उपक्रम

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा