Advertisement

म्हणून नौदलावर भडकले गडकरी!


म्हणून नौदलावर भडकले गडकरी!
SHARES

नौदल म्हटलं की त्यांच्या शिस्तीपुढं बोलायची कुणाची हिम्मत होत नाही. पण केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी याला अपवाद म्हणावे लागतील. कारण क्रूझ टर्मिनलला विरोध करणाऱ्या नौदलावर त्यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं ते देखील वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख वाइस अॅडमिरल गिरीश लुथरा यांच्या उपस्थितीत.

मलाबार हिलमध्ये राजभवन नजीकच्या समुद्रात या विशाल क्रूझरूपी हॉटेलसाठी जागा निश्चित करण्यात आली असून तिथं जाण्यासाठी एनसीपीएजवळ एक जेट्टी उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र या जेट्टीमुळं मरिन ड्राईव्ह परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढून वाहतूककोंडी होईल. परिणामी सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होईल, असं म्हटलं जात आहे.

तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या जेट्टीचं काम करणाऱ्या खासगी कंपनीला मलाबार हिलमध्ये काम करण्यास मनाई केली. वेस्टर्न नेव्हल कमांडने या कंपनीला अद्याप कामासाठी ना हरकत प्रमाणपत्रही दिलेलं नाही. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने काम थांबवण्याचा निर्णय दिल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला नौसेना अधिकाऱ्यांना दक्षिण मुंबईत वास्तव्यासाठी वसाहत बांधून हवी आहे.



काय म्हणाले गडकरी?

पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं उद्घाटन करताना गडकरी म्हणाले, उच्च न्यायालयाची परवानगी असतानाही नौदलाने मरिन ड्राईव्हवर होणाऱ्या तरंगत्या हॉटेलवर आक्षेप घेतला आहे. आपल्याकडे एखादा निर्णय घेतला की त्याला विरोध करण्याची मानसिकताच झाली आहे. असा विरोध करण्याऐवजी तुम्ही बॉर्डरवरील गस्त सांभाळा, इथं लक्ष घालू नका.


एक इंचही जागा देणार नाही

दक्षिण मुंबईत वेस्टर्न नेव्हल आणि नौदल अधिकाऱ्यांना घरासाठी जागा हवी आहे. या जागेसंदर्भात काही अधिकारीही माझ्याकडे आले होते. पण आता त्यांनी माझ्याकडे येऊ नये. कारण मी तुम्हाला इथली एक इंचही जागा देणार नाही. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र सरकारने संयुक्तपणे विकसित केलेल्या पूर्व सागरी किनारपट्टीवरील जमीन केवळ स्थानिक नागरिकांच्या फायद्यासाठीच वापरली जाईल.



हेही वाचा-

देशातल्या पहिल्यावहिल्या अांतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं भूमिपूजन


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा