विकासकामांमुळे सामान्यांना डोकेदुखी

घाटकोपर - निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नगरसेवक कामाला लागल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळतंय. घाटकोपरमध्येही सध्या हीच परिस्थिती आहे. घाटकोपरमधील भाजीमार्केट परिसरातील गटारं आणि रस्त्याचं काम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागतोय. याबाबत नगरसेवक सुरेश आवळे यांना विचारले असता त्यांनी हे काम राज्यसरकारचं असल्याचं सांगत हात झटकलेत. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार नागरिकांचा सुटकारा मिळणार हे पाहाव लागेल.

Loading Comments