Advertisement

गोवंडीत माहिती अधिकार कायद्यावर कार्यशाळा संपन्न


गोवंडीत माहिती अधिकार कायद्यावर कार्यशाळा संपन्न
SHARES

माहिती अधिकार कायद्याचा सध्या मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरु आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सोमवारी गोवंडीतील समाज मंदिर सभागृहात जनजागृती विद्यार्थी संघ आणि सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती अधिकार कायद्याबाबत कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सध्या माहिती अधिकाराचा मोठ्या प्राणात गैरवापर होत असल्याने माहिती अधिकाराचा वापर करण्याची पद्धत,त्याबद्दल शासनाची भूमिका, त्याचे फायदे-तोटे तसेच संबंधित कायद्यांबद्दल त्यांनी उपस्थितांना योग्य माहिती दिली.

माहिती अधिकारासंदभार्तील विविध विषयांवर यावेळी चर्चा रंगली होती. उपस्थितांच्या प्रश्नांना मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यशाळेत 40 सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांसह सुनील येवले, सज्जाद मापारी, शेफाली शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
जनजागृती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संतोष सुर्वे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा