Advertisement

केईएममध्ये परिचारिका दिन साजरा


केईएममध्ये परिचारिका दिन साजरा
SHARES

फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या निरलस रुग्णसेवेचा गौरव म्हणून जगभरात परिचारिका दिन साजरा करण्यात येतो. याच परिचारिका दिनाचे औचित्य साधत केईएम रुग्णालयात 'परिचारिका शुभेच्छा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजही परिचारिका त्याच सेवाभावाने कर्तव्य करत असतात. म्हणून त्यांच्या सेवेला आमचा सलाम असे गौरोवोद्गार महिला आणि बालकल्याण अध्यक्षा नगरसेविका सिंधु मसुरकर यांनी यावेळी काढले. तसेच यावेळी त्यांनी सर्व परिचारिकांना परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोठ्या आस्थेने परिचारिका काम करीत असतात. त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. रुग्ण बरा होणे ही त्यांची पोचपावती असते असंही त्या यावेळी म्हणाल्या. या कार्यक्रमाला नगरसेवक दत्ताराम पोंगडे, 205 चे शाखाप्रमुख जयसिंग भोसले, अपंग सहाय्यक सेना सचिव सुभाष कदम आणि केईएम रुग्णालयाच्या अधिसेविका अरुंधती वेल्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा