Advertisement

पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, कोर्टानं दिला 'हा' निकाल

यासंदर्भातील तक्रार दिलिप शहा आणि त्यांच्या पत्नीनं केली आहे. हे जोडपं वरळीतल्या वेनस कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहतात.

पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, कोर्टानं दिला 'हा' निकाल
SHARES

मुंबईच्या दिवाणी कोर्टानं वरळीतल्या एका कुटुंबाला बालकनीत पक्ष्यांना खाद्य घालण्यास मनाई केली आहे. यासंदर्भातील तक्रार दिलिप शहा आणि त्यांच्या पत्नीनं केली आहे. हे जोडपं वरळीतल्या वेनस कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहतात. त्याच्याच वरच्या मजल्यावर जिगीशा ठाकूर आणि प्रग्या ठाकूर राहतात जे की पक्ष्यांना खाद्य घालतात.

दिलिप शहा आणि त्यांच्या पत्नीची तक्रार आहे की, त्यांनी घातलेल्या खाद्यामुळे पक्षी येतात. त्या पक्ष्यांची घाण, विष्ठा आणि किडे आमच्या बालकनीत पडतात. यामुळे दुर्गंधी देखील सुटते. यामुळे आम्हाला त्वचेचा आजारा देखील झाला आहे.

यावर सिटी सिव्हिल न्यायाधीश ए.एच लदाद म्हणाले की, जेव्हा पक्षी धान्य खाण्यासाठी येतात त्यावेळी त्यांची विष्ठा खाली पडते. शिवाय त्यांचा आवाज शेजाऱ्यांसाठी त्रासदायक आहेच. दिवसातून ३ वेळा हा आवाज ऐकणं खरच कठीण आहे.

न्यायालय प्रतिवादीच्या “करुणामय कृत्या” बद्दलही सहानुभूती दाखवत “हे अत्यंत कौतुकास्पद आणि आदरणीय आहे,” असं मत व्यक्त केलं गेलं. परंतु त्याच वेळी अशा कृतीमुळे इतर माणसांना त्रास देऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे, हे न्यायाधीशांनी स्पष्ट केलं.

त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्याला उत्तर देताना ठाकूर कुटुंबीयांनी सांगितलं की, अर्जदार आणि त्यांचे घरात काम करणारे मदतगार पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी धातूच्या ट्रेचा वापर करतात. प्रतिबंधक कायदा १९६० अन्वये हा मोठा गुन्हा आहे.

तसंच हाऊसिंग सोसायटीला पक्ष्यांना खाण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन देण्याची विनंती करत असल्याचं प्रतिवादींनी म्हटलं आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा