Advertisement

वरळी कोळीवाड्यात पुन्हा कोरोना वाढला, १९७ जण बाधित

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच गेल्यावर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी कोळीवाड्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

वरळी कोळीवाड्यात पुन्हा कोरोना वाढला, १९७ जण बाधित
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच गेल्यावर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी कोळीवाड्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. तब्बल १९७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. वरळी कोळीवाडा आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोना वाढत असून, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गतवर्षी देशभरात वरळी पॅटर्न या नावानं ओळखला गेलेल्या वरळी कोळीवाड्याला पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा बसत आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात वरळी कोळीवाडा आणि आसपासच्या परिसरात तब्बल १९७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात वरळी कोळीवाड्यातील ९७, जनता कॉलनी २१ आणि आदर्शनगरमध्ये ६९ कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

वरळी कोळीवाडा भागात दाटीवाटीची लोकवस्ती असल्यामुळं या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत आहे. या पार्श्वभूमीवर वरळी कोळीवाड्यातील नगरसेविका हेंमागी वरळीकर यांनी नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वरळी कोळीवाड्यात कोरोना रूग्ण सापडल्यामुळे हा भाग सील करण्यात आला होता . तब्बल ६० ते ७० दिवस या भागातील नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

वरळी कोळीवाडा सील केल्यानंतर कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथे प्रभावी योजना येथे राबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर याच पॅटर्न पुढे ‘वरळी पँटर्न’ संपू्र्ण देशभरात चर्चिला गेला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा