फुटपाथची दुरवस्था

 Dalmia Estate
फुटपाथची दुरवस्था
फुटपाथची दुरवस्था
फुटपाथची दुरवस्था
See all

मुलुंड - मुलुंड पश्चिमेकडील लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरील फुटपाथची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पेव्हर ब्लॉक्स निघालेले आहेत. या फुटपाथकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संध्याकाळच्या वेळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम असते. अशा वेळी सामान्य नागरिक चालण्यासाठी फुटपाथचाच वापर करतात. वयोवृद्ध नागरिकांना किंवा अपंग नागरिकांना अशा फुटपाथवर चालणे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या फुटपाथची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading Comments