Advertisement

मुंबई सेंट्रल स्टेशनवर नैसर्गिक प्रकाशकिरणं, पश्चिम रेल्वेचा उपक्रम


मुंबई सेंट्रल स्टेशनवर नैसर्गिक प्रकाशकिरणं, पश्चिम रेल्वेचा उपक्रम
SHARES
Advertisement

हरित उर्जेचा अंगिकार करण्याच्या धोरणातून पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्टेशनवर नैसर्गिक पद्धतीने प्रकाशकिरणं येण्याचा मार्ग अवलंबला आहे. वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर सौर उर्जेचा वापर होत असतानाच त्यात स्टेशनवरील छतांमधून नैसर्गिक पद्धतीने सूर्यकिरणं पसरतील अशा प्रकारची योजना आखली आहे. त्यातून उर्जाबचतीप्रमाणेच स्टेशनच्या सौंदर्यात भर पडत आहे.


हा आहे फायदा

यासाठी मुंबई सेंट्रल स्टेशनवरील छतांकडे विशिष्ट प्रकारच्या पाइप्सचा वापर केला आहे. स्थानकाच्या मुख्य भागात बसवण्यात आलेल्या पाइपमुळे नैसर्गिक पद्धतीने सूर्यकिरण स्थानकात पडत आहे. त्यासाठी छतांकडे बसवण्यात आलेल्या साच्यांमध्ये तशाप्रकारचे बदल केले आहेत. त्यामुळे उर्जेची तर बचत होतच आहे, शिवाय सूर्यप्रकाश असेपर्यंत पॉलिकॉर्बोनेटने तयार केलेल्या छतातून प्रकाश येत राहणार आहे. त्यातील ट्युब्समुळे प्रकाश आणखी पसरण्यास मदत होत आहे.


याप्रकारचा हा पहिलाच प्रयोग

या पद्धतीने छत बांधताना फॉल्स सीलिंग वगळता अन्य छतांमध्ये त्यापद्धतीचे बदल करता येणे शक्य असल्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला आहे. पश्चिम रेल्वेवर याप्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यास यश आलं आहे. त्यातून समान पद्धतीने प्रकाश पसरत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सुमारे २० वर्षांपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित राहत असून पावसातही त्याची परिणामकारता दिसू शकते.

संबंधित विषय
Advertisement