Advertisement

लोकल ट्रेन्सवर डिजिटल डिस्प्लेची सोय, प्रवाशांना काय फायदा?

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर

लोकल ट्रेन्सवर डिजिटल डिस्प्लेची सोय, प्रवाशांना काय फायदा?
SHARES

पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) प्रवाशांना आरामदायी आणि उत्तम रेल्वे प्रवास व्हावा यासाठी रेल्वेकडून नवनवीन प्रयोग केले जातात. याचाच एक भाग म्हणून पश्चिन रेल्वेच्या लोकलमधून (Local Train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्या स्थानकात लोकल पोहोचली आहे, लोकल धीमी की जलद आहे, याबाबतची माहिती देणारे पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे. 

मुंबई (Mumbai) उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी पश्चिम रेल्वेने लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या EMU कारशेडने मोटार डब्यांच्या बाजूच्या पॅनलवर नवीन हेड कोड डिस्प्ले सिस्टीम यशस्वीपणे सादर केली आहे. ही सुविधा प्रवाशांना लोकल कुठे आहे आणि स्लो की फास्ट याची माहिती देणार आहे. 

मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये मोटरमन आणि गार्ड बसतात त्या ठिकाणी लोकल कुठे जात आहे, याची माहिती देण्यात येते. तसेच लोकलच्या आतमधील डिस्प्लेद्वारे लोकलचे मार्गक्रमण समजते. मात्र, लोकलच्या बाहेरील बाजूस अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे मुंबईकरांसाठी मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या लोकलला नवीन ‘हेड कोड डिस्प्ले’ बसविण्यात आला आहे.

यावर प्रवाशांना लोकलच्या गंतव्यस्थानाची स्पष्ट आणि त्वरित माहिती मिळेल. लांबपल्ल्यांच्या गाड्यांप्रमाणेच लोकलला डिस्प्ले लावण्यात आले आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. हा डिजिटल डिस्प्ले 3 सेकंदाच्या अंतराने भाषा बदलून इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये ट्रेनचे गंतव्यस्थान दर्शवेल. याशिवाय ते डिस्प्ले मोड देखील प्रदर्शित करेल जसे की जलद (F) किंवा स्लो (S) आणि ट्रेन 12-कार EMU किंवा 15-कार EMU ट्रेन आहे.

हे डिजिटल डिस्प्ले फुल एचडी टीएफटी (थिन फिल्म ट्रान्झिस्टर) आहेत. हे डिस्प्ले मजबूत काचेने संरक्षित आहेत. ज्यामुळे लोकांना स्क्रीनवर कोड सहज पाहता येईल. डिस्प्ले स्क्रीनचा कॉन्ट्रास्ट देखील सेन्सर्सद्वारे स्वयंचलितपणे नियंत्रित केला जातो, ज्यामुळे मजकूर 5 मीटर अंतरावरून स्पष्टपणे दिसतो. हेही वाचा

ठाणे : घोडबंदर रोडवरील 3 प्रमुख उड्डाणपूल तात्पुरते बंद राहणार

मुंबई-दिल्ली दरम्यान ताशी 160 किमी वेगाने धावणार ट्रेन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा