Advertisement

यास चक्रीवादळामुळं राज्यात पुढचे ३ दिवस धोक्याचे

बंगालच्या उपसागरात यास चक्रिवादळ सध्या रौद्र रूप धारण करत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

यास चक्रीवादळामुळं राज्यात पुढचे ३ दिवस धोक्याचे
SHARES

बंगालच्या उपसागरात यास चक्रिवादळ (yasa cyclone) सध्या रौद्र रूप धारण करत असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. या वादळाने ओडिशा, पश्चिम बंगालला झोडपून काढल्यानंतर आता पुढे हे चक्रिवादळ ओडिशातून, झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या काही भागांत धडकण्याची शक्यता आहे. पण याचा फटका महाराष्ट्रालाही (Maharashtra) बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भातल्या काही भागांमध्ये पुढच्या तीन दिवसांत पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. इतकंच नाहीतर रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड, लातूर, अकोला, कोल्हापूर, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमिवर राज्यात अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या.

या चक्रिवादळाचा महाराष्ट्रातील किनारपट्टीला धोका नसला तरी ओडिशाला लागून असलेल्या काही भागांमध्ये मात्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यास चक्रिवादळ जस-जसं पश्चिम बंगालकडून झारखंड, बिहार, छत्तीसगडकडे प्रवास करेल, तस तसा या भागात सौम्य पाऊस आणि वादळी वारे वाहू शकतात.



हेही वाचा - 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा