Advertisement

झामझड पाड्यात ७० वर्षांनी अवरली वीज

गोराईतील झामझड पाडा इथं शुक्रवारी ७० वर्षांनंतर वीज पोहोचली आणि तिथं राहणाऱ्या रहिवाशांचं जीवन खऱ्या अर्थाने उजळलं. अदानी इलेक्ट्रिसिटीने २ कोटी रुपये खर्च करून इथ दीड किलोमीटरची भूमिगत केबल टाकत, वीजपुरवठा सुरू केला आहे.

झामझड पाड्यात ७० वर्षांनी अवरली वीज
SHARES

मुंबईत असंही एक ठिकाण आहे जिथं स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही वीज पोहोचलेली नव्हती, असं सांगूनही कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु हे खरं आहे. गोराईतील झामझड पाडा इथं शुक्रवारी ७० वर्षांनंतर वीज पोहोचली आणि तिथं राहणाऱ्या रहिवाशांचं जीवन खऱ्या अर्थाने उजळलं. अदानी इलेक्ट्रिसिटीने २ कोटी रुपये खर्च करून इथ दीड किलोमीटरची भूमिगत केबल टाकत, वीजपुरवठा सुरू केला आहे.


५२ कुटुंब प्रतिक्षेत

गोराईपासून दीड ते दाेन किमी अंतरावर झामझड पाडा आहे. या पाड्यात एकूण ५२ कुटुंब राहतात. तब्बल ७० वर्षांपासून या पाड्यात वीज पोहोचलेली नव्हती. या पाड्यात वीज पोहोचवण्यासाठी भूमिगत केबल टाकून तिथं वीज उपकेंद्र उभारणं गरजेचं होतं. परंतु वीजकेंद्र उभारण्यासाठी आवश्यक जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असल्याने तसंच या कामासाठी परवानगी मिळत नसल्याने वीजकेंद्र उभारण्यास अडचण येत होती.


भूमिगत केबल टाकली

अखेर ६ महिन्यांपूर्वी अदानीला या भागात वीजकेंद्र उभारण्यास परवानगी मिळाल्यानंतर भूमिगत केबल टाकण्याचं काम सुरू झालं. त्यानुसार अदानीने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी जवळ असलेल्या वीज उपकेंद्रातून दीड किलोमीटर लांबीची केबल टाकून शुक्रवारी झामझडपाड्यात वीज आणली.


पक्क्या घरांना वीज जोडणी

या वीज केंद्रातून झामझड पाड्यातील ५२ पैकी ४८ पक्क्या घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. तर उरलेल्या ४ घरांना अद्याप सुरक्षेच्या कारणामुळे वीज जोडणी देण्यात आली नसल्याचं अदानी इलेक्ट्रिसिटीने स्पष्ट केलं आहे.

तब्बल ७० वर्षांनंतर झामझड पाड्यात वीज अवतरल्याने रहिवाशांनी ढोलताशांच्या तालावर नाचत तसंच पेढे वाटत आपला आनंद साजरा केला. या वीजेमुळे केवळ आमचा परिसरच नव्हे, तर जीवन प्रकाशमय झाल्याची प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली.



हेही वाचा-

मुंबईकरांवर पाणीबाणी, धरणांत फक्त २२ टक्के पाणीसाठा

'गोदरेज प्रॉपर्टीज'ने विकत घेतला आर.के, स्टुडिओ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा