Advertisement

घ्या ताजी ताजी फार्म फ्रेश भाजी...


SHARES

दहिसर - 'फार्म फ्रेश' भाज्यांचा बाजार दहिसरमधील कांदरपाडा परिसरात भरतोय. मास्टर शेफ हॉटेलच्या समोर होणाऱ्या या शेतकरी आठवडा बाजारात थेट शेतातून शेतमाल विक्रीसाठी येतोय. त्यामुळे ग्राहकांना ताज्या आणि स्वस्त भाज्यांचा आस्वाद घेता येतोय. दीपलक्ष्मी सेवा सहकारी संस्थेच्या मार्फत संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडा बाजारात ही ताजी भाजी ग्राहकांना मिळते आहे. या आठवडा बाजाराला अभिनेता स्वप्नील जोशीनंही हजेरी लावली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा