Advertisement

शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत


शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत
SHARES

घाटकोपर - कोकण भूमी प्रतिष्ठानच्यावतीनं शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेला शेतमाल बाजारात येऊन थेट ग्राहकांना विकला. घाटकोपर पूर्व मधील संकल्प सेवा संघ येथे शेतकऱ्यांनी शेतकरी बाजार लावला होता. यावेळी बाजार भावाच्या तुलनेत शेतकऱ्यांचा शेतमाल स्वस्त दरात थेट ग्राहकांपर्यंत पोहचविला आहे. शेतकरी आपला भाजीपाला बाजारात येऊन विकत असल्यामुळे ग्राहक देखील खूश आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना देखील स्वस्त दरात चांगली ताजी भाजी मिळतेय. मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर, कांद्याची पात आणि कोंथिबीर 1 नग 10 रुपयात होते. तर टोमॅटो आणि कांदा 10 रुपये किलो होता. मिर्ची 20 रुपये किलो, काकडी 40 रुपये किलो, शिमला मिर्ची 30 रुपये किलो, वाटाणा 40 रुपये किलो, वांगी 30 रुपये किलो आणि बटाटा 15 रुपये किलोंनी विकले. बाजारात उपलब्ध असलेली भाजी ताजी नसून, त्या भाजीवर पाणी मारून ताजी ठेवली जाते. आता शेतकरी आपला भाजी-पाला थेट ग्राहकांपर्यंत पोचवत असल्यामुळे शेतकऱ्याला आणि ग्राहकांना एकमेकांशी संवाद साधता येत असल्याचं ईशा आरोरा यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा