Advertisement

लॉकडाऊन वाढल्याने आयपीएल जवळपास रद्दच

लाॅकडाऊन वाढल्याने आता दरवर्षी होणारी किक्रेट टी २० लीग म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धा संकटात सापडली आहे.

लॉकडाऊन वाढल्याने आयपीएल जवळपास रद्दच
SHARES
Advertisement

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी २१ दिवसांचा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन असेल. लाॅकडाऊन वाढल्याने आता दरवर्षी होणारी किक्रेट  टी २० लीग म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धा संकटात सापडली आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम आता जवळपास रद्द झाल्यातच जमा आहे.

आयपीएल स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती, मात्र कोरोनामुळे ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. लाॅकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र, आता लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढला आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. बीसीसीआयकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा आज किंवा उद्या १५ एप्रिल रोजी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

ही स्पर्धा ३ मे नंतर देखील होण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा कोरोनाची परिस्थितीत कशी असते त्यावर केंद्र सरकार निर्णय घेईल. खुद्द पंतप्रधान मोदींनी ३ मेनंतर देखील रुग्ण वाढले तर अडचणी आणखी वाढतील असे म्हटले आहे. त्यामुळे बीसीसीआयकडे आयपीएल जून ते डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्याचा पर्याय आहे. पण तेव्हा देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमाचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. हेही वाचा -

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन - नरेंद्र मोदी

प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माची अंधश्रद्धेतूनच आत्महत्या, मिञाविरोधात गुन्हा दाखल
संबंधित विषय
Advertisement