Advertisement

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत २० जण


भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत २० जण
SHARES

तुषार अारोठे यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल २० जण प्रशिक्षकाच्या शर्यतीत अाहेत. भारताचा माजी फिरकीपटू सुनील जोशी अाणि रमेश पोवार यांच्यासह २० जणांच्या महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी शुक्रवारी मुलाखती होणार अाहेत. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील रिक्रिएशन सेंटरमध्ये अाज या मुलाखती होणार असून सुनील जोशी, रमेश पोवारसह भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा, विजय यादव तसेच माजी महिला क्रिकेटपटू ममथा माबेन अाणि सुमन शर्मा हे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अाघाडीवर अाहेत. न्यूझीलंडसाठी २ कसोटी अाणि ५१ वनडे सामने खेळणारी मारिया फाहे हिनेही प्रशिक्षकपदासाठी अर्ज पाठवला अाहे.


जोशी, पोवार दावेदार

सुनील जोशी अाणि रमेश पोवार यांच्यापैकी एक जण प्रशिक्षकपदाचा दावेदार ठरणार अाहे. पोवारने २ कसोटी तर ३१ वनडे सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं असून तो सध्या भारतीय महिला संघाचा हंगामी प्रशिक्षक म्हणून काम पाहत अाहे. सुनील जोशीचा खेळाडू अाणि प्रशिक्षक म्हणून अनुभव वाखाणण्याजोगा अाहे. भारताकडून १५ कसोटी अाणि ६९ वनडे खेळणाऱ्या सुनील जोशीने अोमान अाणि बांगलादेश या संघांचे प्रशिक्षकपद सांभाळले अाहे. त्याचबरोबर त्याने जम्मू अाणि काश्मीर, अासाम व हैदराबाद संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली अाहे.


हे घेणार मुलाखत

बीसीसीअायवर नेमण्यात अालेल्या प्रशासकीय समितीच्या सदस्या अाणि भारतीय महिला संघाची माजी कर्णधार डायना एडल्जी तसेच बीसीसीअायच्या क्रिकेट अाॅपरेशन्सचे महाव्यवस्थापक साबा करीम, हंगामी सचिव अमिताभ चौधरी हे २० जणांच्या मुलाखती घेणार अाहेत. शुक्रवारी भारतीय महिला संघाच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा होण्याची शक्यता अाहे.


हेही वाचा -

भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदावरून तुषार अारोठे पायउतार

रमेश पोवारवर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या हंगामी प्रशिक्षकाची जबाबदारी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा