आयपीएल चषक सिद्धिविनायक चरणी

 Prabhadevi
आयपीएल चषक सिद्धिविनायक चरणी

मुंबई इंडियन्सने रविवारी झालेल्या चुरशीच्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंटचा 1 रन ने पराभव केला आणि आयपीएलच्या 10 व्या मोसमातील विजेतेपद मिळवले. मुंबई इंडियन्सचे हे तिसरे विजेतेपद आहे. आयपीएल विजेत्या मुंबईच्या खेळाडूंनी चषक हाती घेऊन रात्रभर जल्लोष केला. त्यानंतर सोमवारी सकाळी मुंबई इंडियन्स संघाचे मालक अनंत अंबानी यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आयपीएल चषक त्यांच्या चरणी ठेवला.

मागील दोन्ही वेळेस फायनल जिंकल्यावर अंबानी परिवारातील सदस्याने सिद्धिविनायक मंदिरात येऊन बाप्पाच्या चरणी चषक ठेवून आपल्या भक्तीचे दर्शन घडवले होते. यंदाच्या वर्षीही अंबानी परिवाराने ही परंपरा कायम ठेवली. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा चषक मुंबईत दाखल होताच, अनंत अंबानी चषकासह मंदिरात पोहोचले. यावेळी क्रिकेटच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

Loading Comments