Advertisement

पृथ्वी शाॅचे तंत्र सचिन तेंडुलकरसारखे - मार्क वाॅने केली स्तुती


पृथ्वी शाॅचे तंत्र सचिन तेंडुलकरसारखे - मार्क वाॅने केली स्तुती
SHARES

मुंबईकर पृथ्वी शाॅच्या फलंदाजीचे तंत्र हे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीसारखेच अाहे, असे कौतुकोद्गार अाॅस्ट्रेलियाचे महान खेळाडू मार्क वाॅ यांनी काढले अाहे. पृथ्वी शाॅचे तंत्र पहा, ते सचिन तेंडुलकरसारखेच अाहे, अशा शब्दांत मार्क वाॅ यांनी पृथ्वी शाॅची स्तुती केली अाहे.


पृथ्वी शाॅची ग्रिप, त्याचा स्टान्स, सुरुवातीपासूनच तो क्रिझवर ठाण मांडतो, खेळपट्टीच्या सर्व बाजूला फटके लगावतो. शेवटच्या क्षणी चेंडूवर जाऊन फटका लगावणे, तितक्याच ताकदीने फटके लगावणे, गोलंदाजाने टाकलेल्या कोणत्याही चेंडूला सीमारेषेपार भिरकावण्याची क्षमता असणे, या सर्व गोष्टी सचिन तेंडुलकरशी मिळत्याजुळत्या अाहेत.
- मार्क वाॅ, अाॅस्ट्रेलियाचा महान फलंदाज


अायपीएलमध्ये पृथ्वीची दमदार कामगिरी

मुंबईच्या पृथ्वी शाॅने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना यंदाच्या अायपीएलमध्ये चार सामन्यांत १६६.६६च्या सरासरीने १४० धावा फटकावल्या अाहेत. त्याने अायपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात अर्धशतक झळकावण्याची करामत केली होती. पृथ्वीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या वर्षी १९ वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला होता.


हेही वाचा -

विरार ते भारताचा U-19 कर्णधार, ‘वंडर बाॅय' पृथ्वी शाॅची संघर्षगाथा

'पृथ्वी तू घराचं टेन्शन घेऊ नकोस'- उद्धव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा