Advertisement

'पृथ्वी तू घराचं टेन्शन घेऊ नकोस'- उद्धव


'पृथ्वी तू घराचं टेन्शन घेऊ नकोस'- उद्धव
SHARES

चौथ्यांदा U-19 विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शाॅ याने अाज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी या युवा क्रिकेटपटूला शाबासकी देतानाच त्याला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वेळी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी अाणि शिवसेनेचे नेते अादित्य ठाकरे यांनी पृथ्वीचा सत्कार करताना त्याला गणेशमूर्ती भेट म्हणून दिली.


घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

पृथ्वीने केलेल्या कामगिरीला तोड नाही. भारताला मिळवून दिलेल्या विश्वचषकाचं वर्णन शब्दांत करता येणार नाही. पृथ्वी, तू घराचं टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर. अाम्ही तुला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असं अाश्वासन उद्धव ठाकरे यांनी पृथ्वीला दिलं.


शिवसेनेच्या अामदाराचाही प्रयत्न

पृथ्वी शाॅ याला अापला मानसपुत्र मानणारे शिवसेनेचे अामदार संजय पोतनीस यांनीही मुंबईच्या या प्रतिभावान युवा क्रिकेटपटूला अापलं हक्काचं घर मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली अाहे. पृथ्वी शाॅ याला मुंबईत भाड्याचं घर मिळवून देण्यासाठी पोतनीस यांनीच प्रयत्न केले होते.


हेही वाचा -

भारतासाठी वर्ल्डकप जिंकलो हाच अभिमानास्पद क्षण - पृथ्वी शॉ


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा