Advertisement

आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

आयपीएलच्या १४ व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत.

आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार
SHARES

आयपीएलच्या १४ व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. अहमदाबाद, बेंगलुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे सामने होणार आहेत. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने रविवारी  ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

दोन वर्षानंतर आयपीएल भारतात खेळवले जाणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यात आले होते. यंदा ९ एप्रिल ते ३० मे पर्यंत आयपीएलची स्पर्धा रंगणार आहे. ९ एप्रिलला चेन्नई येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात टक्कर होणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर प्ले ऑफचे तसंच ३० मे २०२१ रोजी अंतिम सामना होणार आहे. 

प्रत्येक संघ लीगच्या टप्प्यात चार ठिकाणी सामना खेळेल. ५६ लीग सामन्यांपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगलुरू येथे प्रत्येकी १० सामने तर अहमदाबाद व दिल्ली येथे प्रत्येकी ८ सामने खेळले जातील. यंदाच्या आयपीएलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सामना  खेळणार नाही. लीगच्या टप्प्यात सर्व संघ ६ पैकी ४ ठिकाणी खेळतील.

या पर्वात एकूण ११ डबल हेडर मॅच खेळवण्यात येणार आहेत. डबल हेडर म्हणजेच एकाच दिवसात २ सामने. साधारणपणे हे डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवण्यात येतात. डबल हेडरमधील पहिल्या सामन्याला दुपारी ३. ३० वाजता सुरुवात होणार आहे. तर दिवसातील दुसऱ्या सामना संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा