Advertisement

दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय संघ जाहीर, अश्विन, रोहितला विश्रांती


दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय संघ जाहीर, अश्विन, रोहितला विश्रांती
SHARES

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी भारतीय नियामक मंडळानं (BCCI) भारतीय संघ जाहीर केला आहे. दुसरी कसोटी शुक्रवारपासून पर्थ इथं सुरू होणार आहे. मात्र, १३ सदस्यांच्या या संघातून फिरकीपटू आर. अश्विन आणि फलंदाज रोहित शर्मा यांना दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे.

कुणाला संधी?

रोहित शर्माला कंबरदुखीचा, तर अश्विनला पोटाचा त्रास होऊ लागल्याने या दोघांनाही दुसऱ्या टेस्टमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्याजागी संघात रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, अॅडलेड टेस्टमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला ३१ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मात्र, उद्यापासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय संघात बदल पाहायला मिळणार आहे. त्यामुळं दुसरी टेस्ट मॅच भारत जिंकणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय संघ:

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा