Advertisement

हार्दिक पांड्याला बीसीसीआयची नोटीस


हार्दिक पांड्याला बीसीसीआयची नोटीस
SHARES

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना भारतीय नियामक बोर्ड (BCCI) नं नोटीस पाठवली आहे. पांड्या आणि राहुल या दोघांनी एका खाजगी शो मध्ये महिलांच्या संबंधांवरून वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. आता बीसीसीआयनं देखील त्यांनी केलेल्या व्यक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीय.


पांड्याची जीभ घसरली

हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल दोघे नुकतेच टीव्हीवर प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये गेले होते. करण जोहरच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना हार्दिक पांड्याची जीभ घसरली होती. करणनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना हार्दिक म्हणाला की, मी पार्टीला गेलो तर मुलींचा शेप आणि त्यांचे मुव्ह बघतो. याशिवाय मी माझ्या कुटुंबियांसोबत मोकळेपणानं बोलतो. मी जेव्हा व्हर्जिनीटी लूज केली तेव्हा घरी येऊन बोललो की मी करून आलो. मी माझ्या आई वडिलांना विचारलं की, मी त्यांचाच मुलगा आहे का? की लहान असताना मला वेस्ट इंडिज मुलाबरोबर एक्सेंच केलं, अशा वक्तव्यामुळे त्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

चाहत्यांची नाराजी पाहता हार्दिक पांड्यानं ट्विटरवरून चाहत्यांची माफी मागितली. तर के. एल. राहुलनं मात्र अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण सध्या बीसीसीआयच्या नोटिसीनुसार दोघांना २४ तासांत स्पष्टीकरण द्यायचं आहे.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा