Advertisement

सचिनच्या जर्सीवरून फॅन्सचा संताप, बीसीसीआयने रिटायर्ड केली १० नंबरची जर्सी!


सचिनच्या जर्सीवरून फॅन्सचा संताप, बीसीसीआयने रिटायर्ड केली १० नंबरची जर्सी!
SHARES

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची १० नंबरची जर्सी यांचं जणूकाही अतूट नातं निर्माण झालं आहे. त्याच्या निवृत्तीनंतरही १० नंबरची जर्सी ही त्याच्याच नावाशी निगडीत राहिली आहे. आणि या जर्सीसोबत फक्त सचिनच्याच नाही, तर त्याच्या फॅन्सच्याही भावना निगडीत आहेत. आणि विरोधाभास असा, की सचिनची ही जर्सी त्याच्या फॅन्सच्या या प्रेमामुळेच बीसीसीआयला निवृत्त करावी लागली आहे.
काय केलं शार्दूल ठाकूरनं?

शार्दूल ठाकूर या नवोदित मुंबईकर क्रिकेटरने सप्टेंबर महिन्यात त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच श्रीलंकेविरूद्ध खेळताना ही १० नंबरची जर्सी घातली होती. खरंतर, त्याने त्याच्या जन्मतारखेच्या बेरजेसाठी १० नंबरची जर्सी घातली होती. सचिनच्या चाहत्यांना मात्र त्याने ही जर्सी घालणं पचलं नाही. त्यामुळे शार्दूल ठाकूरला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं.


सचिनची जर्सी 'अनऑफिशिअली' रिटायर्ड!

फुटबॉलमध्ये एखाद्या महान प्रसिद्ध खेळाडूची जर्सी निवृत्त करण्याची पद्धत अस्तित्वात आहे. मात्र, आयसीसीच्या नियमांमध्ये खेळाडूची जर्सी निवृत्त करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे, नाईलाजास्तव बीसीसीआयला 'अनऑफिशिअली' सचिनची जर्सी रिटायर्ड केली आहे.


शार्दूलच्या जन्मतारखेच्या बेरजेचं गणित

एका मुलाखतीमध्ये शार्दूल ठाकूरने ही जर्सी घातल्याचं कारण नमूद केलं आहे. 'आपल्या वाढदिवसाच्या तारखेची बेरीज १० होत असल्यामुळे आपण ही जर्सी निवडली' असं त्याने सांगितलं. शार्दूलची जन्मतारीख १६/१०/१९९१ अशी आहे. या सर्व आकड्यांची बेरीज ही शेवटी १० येते. त्यामुळेच त्याने १० नंबरच्या जर्सीची निवड केली होती. सचिनच्या चाहत्यांना मात्र त्याचा हा निर्णय मान्य नव्हता. अखेर बीसीसीआयने ही जर्सी रिटायर्ड केली आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement