Advertisement

आयपीएलला स्थगिती, उशीरा सुचलेलं शहाणपण!


आयपीएलला स्थगिती, उशीरा सुचलेलं शहाणपण!
SHARES

भारतात कोरोना प्रचंड वाढतोय आणि आता या कोरोनाचा फटका इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलला ही बसलाय. आयपीएल स्पर्धा खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण होतेय. त्यामुळं बीसीसीआयला अखेर आयपीएला स्थगिती घ्यावी लागली. पण हे बीसीआयला उशीरा सुचलेलं शाहाणपण म्हणावं लागेल का?

कारण एकिकडं कोरोनानं भारताला चांगलंच टार्गेट केलंय. रुग्णांना उपचारासाठी बेड्स मिळत नाहीये, ऑक्सिझन, लसींची कमतरता भासत आहे. अशा परिस्थिती बीसीसीआयनं आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेतला. पण देशाची परिस्थिती गंभीर असतानाही बीसीसीआयनं आयपीएल खेळवण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य होता का?

आयपीएलच्या १३वा मोसमचं युएईमध्ये जैव सुरक्षित वातावरणात म्हणजेच 'बायोबबल'मध्ये यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. आणि त्यामुळं १४ व्या मोसमाचं आयोजन यशस्वी होईल असा बीसीसीआयचा विश्वास होता. पण कोरोनानं आता थेट खेळाडूंसाठी सुरक्षित असलेल्या बायोबबल'मध्येच घुसकोरी केलीये. त्यामुळं आता खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.

आयपीएल ही बाहेरच्या देशातील खेळाडूंना घेऊन खेळवली जाते. त्यामुळं यंदाच्या आयपीएलसाठी भारतात आलेल्या खेळाडूंची जबाबदारी बीसीसीआय घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला. कारण कोरोनामुळं अनेक देशांनी आपली सीमा भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठी बंद केल्या आहेत. तसंच, सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी सध्यस्थितीत बेड्स उपलब्ध होत नाहीयेत. अशापरिस्थितीत खेळाडूंचं काय होणार? 

दरम्यान, बीसीसआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानलं जात. असं असताना मायदेशाची परिस्थिती गंभीर असूनही बीसीसीआयनं कोट्यावधी रुपये खर्च करत आयपीएल स्पर्धा खेळवली मात्र मायदेशाला मदत करावेसे वाटलं नाही का? असा सवाल सामान्य जनता विचारत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा