Advertisement

धक्कादायक! पृथ्वी शॉ ८ महिन्यांसाठी निलंबित, खोकल्याचं औषध प्यायल्याची कबुली

खोकल्यासाठी घेतलेलं औषध त्याला महागात पडलं आहे. उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी ठरल्यानं पृथ्वी शॉला BCCIनं ८ महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला क्रिकेट खेळता येणार नाही.

धक्कादायक! पृथ्वी शॉ ८ महिन्यांसाठी निलंबित, खोकल्याचं औषध प्यायल्याची कबुली
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) सलामीवीर फलंदाज (India opener) आणि मुंबईचा खेळाडू पृथ्वी शॉ (prithvi shaw) याला मोठा धक्का बसला आहे. खोकल्यासाठी घेतलेलं औषध त्याला महागात पडलं आहे. उत्तेजक द्रव्य चाचणीत (dope test) दोषी ठरल्यानं पृथ्वी शॉला बीसीसीआयनं (BCCI) ८ महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. त्यामुळं १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला क्रिकेट (Cricket) खेळता येणार नाही.

८ महिन्यांसाठी निलंबित

पृथ्वीला ८ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. १६ मार्च २०१९ ते १५ नोव्हेंबर २०१९ असा निलंबनाचा कालावधी असेल. त्यामुळे बांगलादेश (Bangladesh) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) भारतात होणाऱ्या आगामी मालिकांमध्ये त्याला संधी मिळू शकणार नाही आहे.

प्रतिबंधित पदार्थाचे सेवन

पृथ्वी शॉनं अनावधानानं प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केलं आहे. हा पदार्थ कफ सीरपमध्ये आढळतो. मात्र, हे डोपिंग नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळ त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याच बीसीसीआयनं स्पष्ट केलं.

अनावधनानं चूक

बीसीसीआयच्या या निर्णयानंतर पृथ्वीनं ट्विटरद्वारे अनावधनानं चूक झाल्याच म्हटल आहे. 'मी प्रामाणिकपणे माझी चूक स्वीकारत आहे. गेल्या स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त असताना औषधं घेताना माझ्याकडून हे घडल असाव. क्रिकेट हे माझं आयुष्य आहे. मुंबईचं तसंच देशाचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी सर्वाधिक अभिमानास्पद आहे. लवकरात लवकर दमदार पुनरागमन करण्याचा माझा मानस आहे', असं त्यानं म्हटलं आहे. युवा खेळाडूंनी औषधे घेताना सावधगिरी बाळगणं बंधनकारक आहे. माझ्या या चुकीमुळं अन्य खेळाडूंना प्रेरणा मिळेल. तसंच, खेळाडूंनी ‘वाडा’च्या नियमांचं पालन करण्याची आवश्यकता आहे,’’ असंही पृथ्वीनं सांगितलं.

२३७ धावा

१९ वर्षीय पृथ्वी भारताकडून २ कसोटी सामने (test match) खेळला असून त्यानं एक शतक आणि एका अर्धशतकासह २३७ धावा केल्या आहेत. १९ वर्षांखालील विश्वचषक (under 19 world cup) विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या पृथ्वीनं कसोटीत पदार्पणातच शतक झळकवले होते.



हेही वाचा -

४९६ किमी वेगाने धावणार हायपरलूप, मुंबई-पुणे प्रकल्प होणार २ टप्प्यांत पूर्ण

विराट अजूनही कर्णधार कसा? सुनील गावस्कर यांचा निवड समितीला प्रश्न



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा