भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी - ब्रेट ली

Sewri
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी - ब्रेट ली
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी - ब्रेट ली
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी - ब्रेट ली
See all
मुंबई  -  

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करण्याची संधी असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने मांडले. गुरुवारी मुंबईत 'चाईल्ड केअर सेंटर' येथील एका सामाजिक कार्यक्रमाला ब्रेट ली हजर होता तेव्हा त्याने भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.

ही आत्तापर्यंतची एक चांगली मालिका आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची चांगली संधी असल्याचं देखील ली यावेळी म्हणाला.

4 जूनला जो भारत-पाकिस्तानमध्ये  सामना झाला त्यामध्ये भारतीय संघांचा खेळ दिसून येतो. श्रीलंकेसोबत गुरुवारचा सामना भारत जिंकला तर उपांत्य फेरीत भारतीय संघ पोहोचेल, असेही त्याने सांगितले. तर दुसरीकडे 'ए' ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाला जर सेमीफायनलमध्ये जायचे असेल तर त्यांना 10 जूनला इंग्लंडला हरवावे लागेल असेही ली म्हणाला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.