चामिंडा वास देतोय युवकांना जलदगती गोलंदाजीचे धडे!

 Charni Road
चामिंडा वास देतोय युवकांना जलदगती गोलंदाजीचे धडे!

श्रीलंकेचा वेगवान माजी गोलंदाज चामिंडा वास सध्या मुंबईमध्ये युवकांना तेज गोलंदाजीचे धडे देत आहे. ज्वाला फाऊंडेशन अॅकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात लिजेंड चामिंडा वास याच्याकडून खास तेज गोलंदाजीचे धडे दिले जात आहेत. 14, 15 आणि 18 वर्षांखालील खेळाडूंना तो धडे देत आहे.

17 मे ते 21 मे पर्यंत चर्नीरोड येथील पोलीस जिमखान्यावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 2013 पासून चामिंड वास युवकांना क्रिकटचे धडे देत आहे. गोलंदाजांमध्ये खूप मेहनत आणि संयमाची गरज असल्याचं सांगत त्याने प्रभावशाली गोलंदाज मेहनतीने घडू शकतो असं मत व्यक्त केले आहे.

या प्रशिक्षण शिबिराचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'च्या यु ट्यूब चॅनलला भेट द्या. थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Loading Comments