Advertisement

आयपीएलमध्ये चिअर लिडर्सही नाचणार

स्टेडियम पुर्णपणे रिकामे असल्याने खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी चिअर लिडर्स आणि प्रेक्षकांची खास तजवीज केली जाणार आहे.

आयपीएलमध्ये चिअर लिडर्सही नाचणार
SHARES
इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम संयुक्त अमिरात (युएई) मध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. १० नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.  चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्समध्ये पहिला सामना रंगणार आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून सामने पाहता येणार नाहीत. प्रेक्षकांशिवाय हे सामने होणार असल्याने स्पर्धेचा माहोल बनवण्यासाठी आयपीएल संघमालकांनी नामी शक्कल लढवली आहे. स्टेडियम पुर्णपणे रिकामे असल्याने खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी चिअर लिडर्स आणि प्रेक्षकांची खास तजवीज केली जाणार आहे. संघमालक मोकळ्या मैदानात अतिरिक्त स्क्रीनची व्यवस्था करणार असून यावर प्रेक्षकांच्या रेकॉर्ड केलेल्या भावमुद्रा आणि चिअर लिडर्स यांचे व्हिडिओ दाखवले जातील. विकेट पडल्यावर, चौकार-षटकार खेचल्यावर टीव्ही स्क्रीनवर चिअर लिडर्स नाचताना दिसतील. संघमालकांनी लढवलेली ही शक्कल खेळाडूंनाही आवडली आहे. सनरायझर्स हैद्राबाद संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावर म्हणाला की,  सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मैदान मोकळे ठेवले जाणार आहे. यामुळे अनेक संघमालकांनी चिअर लिडर्स छोटे-छोटे व्हीडिओ आधीच तयार ठेवले आहे. त्या-त्या संघाच्या मैदानावरील लढतीदरम्यान हे व्हीडिओ चौकार, षटकार मारल्यावर चालवले जातील. यामुळे खेळाडूंना आपण मोकळ्या मैदानात खेळतोय असे वाटणार नाही. आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल, व खेळही रोमांचित होईल.

हेही वाचा -

'आयपीएल'चं वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर...

आयपीएलपूर्वीच रोहित शर्माची दमदार फटकेबाजी


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा