Advertisement

चेन्नई सुपरकिंग्सचा सलामीवीर अजूनही आयसोलेशनमध्ये

कोरोनाची लागण झालेला चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड अद्यापही आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबात शक्यता कमी आहे.

चेन्नई सुपरकिंग्सचा सलामीवीर अजूनही आयसोलेशनमध्ये
SHARES

कोरोनाची लागण झालेला चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड अद्यापही आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबात शक्यता कमी आहे. ऋतुराज गायकवाडला गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली आहे.

 सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन म्हणाले की, ऋतुराज गायकवाड ‘पूर्णपणे ठीक’ आहे, पण संघात सामील होण्यास अद्याप त्याला बीसीसीआयची मंजुरी मिळाली नाही. ऋतुराजला अद्याप बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाद्वारे हिरवा कंदील मिळालेला नाही. तो आयसोलेशनमध्ये आहे. पहिल्या सामन्यासाठी तो उपलब्ध असण्याची शक्यता नाही. आम्ही येत्या काही दिवसात तो पुनरागमन करण्याची अपेक्षा करत आहोत. त्याची प्रकृती चांगली आहे” असे विश्वनाथन यांनी सांगितले.

चेन्नई सुपरकिंग्ज क्रिकेट संघासह सहाय्यक पथकातील १३ सदस्यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ऋतुराज गायकवाड आणि दीपक चहर हे खेळाडू होते. चहर आणि इतर ११ जणांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यावर त्यांनी पुन्हा प्रशिक्षण सुरु केले आहे.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा