आयसीसीच्या क्रमवारीत कुलदीप यादव दुसऱ्या स्थानी

कुलदीप यादवनं तिसऱ्या टी २० सामन्यात न्यूझीलंडचे सलामीवीर सिफर्ट आणि मुनरो या दोघांना बाद केले. २ गडी बाद केल्यामुळे ‘आयसीसी’च्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत ७२८ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

SHARE

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत भारताला २-१ अशी हार पत्करावी लागली. मात्र, या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं चांगलीच कामगिरी केली. अखेर त्याला त्याच्या कामगिरीचं योग्य फळ मिळालं आहे. 'आयसीसी'नं सोमवारी जाहीर केलेल्या टी-20 क्रिकेटमधील गोलंदाजीच्या क्रमवारीत त्यानं दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

कुलदीप यादवनं तिसऱ्या टी २० सामन्यात न्यूझीलंडचे सलामीवीर सिफर्ट आणि मुनरो या दोघांना बाद केले. २ गडी बाद केल्यामुळे ‘आयसीसी’च्या ताज्या गोलंदाजी क्रमवारीत ७२८ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. अफगाणिस्तानचा राशिद खान ७९३ गुणांसह या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.


दरम्यान, भारताचा अष्टपैलू फिरकीपटू कृणाल पांड्याला या क्रमवारीत ३९ गुणांची बढती मिळाली आहे. त्यामुळे तो कारकिर्दीतील सर्वोत्तम ५८व्या स्थानी पोहोचला आहे. तसंच, रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनाही क्रमवारीत बढती मिळाली आहे.


हेही वाचा

...आणि धोनीनं राखला तिरंग्याचा मान!

टी-२० वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर, पण भारत, पाकिस्तान संघ वेगवेगळ्या गटातसंबंधित विषय
ताज्या बातम्या